शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.वर प्रशासकांच्या नियुक्तीवरून उठले वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री हे दुसºया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे पालकत्व असलेल्या जिल्ह्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना अधिकार : आमदारांसह अनेकांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुदत संपणाऱ्या किंवा संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे सध्या शक्य नसल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देणारा शासन आदेश सोमवारी (दि.१३) काढण्यात आला. त्यावरून जिल्ह्यात राजकीय मंडळींनी वादळ उठवले आहे. हे अधिकार आमदारांना असावे अशी मागणी आमदारांनी केली तर काही मंडळींनी राजकीय व्यक्तीकडे हे अधिकारच नको, अशीही भावना व्यक्त केली आहे.ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पालकमंत्री हे दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे पालकत्व असलेल्या जिल्ह्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. असे असताना त्यांना यासंदर्भातील अधिकार देणे ही बाब स्थानिक लोकांवर अन्याय करणारी असून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार त्या क्षेत्राच्या आमदारांना द्यावे अशी मागणी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी यांनी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते व ग्रामविकास मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. याच पद्धतीची मागणी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे यांनीही केली आहे.समाजमाध्यमावरही या विषयावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात काही लोकांनी नेमणुकीच्या शिफारसीचे अधिकार राजकीय लोकांना देण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ठेवावे आणि त्यांनी पूर्वीप्रमाणे कनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी किंवा चारित्र्य तपासून माजी सरपंचांची नेमणूक करावी अशी भावना व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नियुक्त्या दोन महिन्यांपूर्वीच झाल्या आहेत. पण आता नव्याने नियुक्त्या होऊ शकतात.२०० वर ग्रामपंचायतींवर प्रशासकगडचिरोली जिल्ह्यातील २०० वर ग्रामपंचायतींची मुदत जून महिन्यापूर्वीच संपल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर आधीच विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे. एका विस्तार अधिकाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. आता या नवीन जीआरमुळे त्या सर्व ग्रामपंचायतींवर नव्याने प्रशासकांच्या नियुक्त्या होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संवैधानिक बाधा निर्माण होण्याची शक्यता?राज्यातील आघाडी सरकारचा मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ आणि राज्यघटनेत ९३ वीज दुरूस्ती करून भारतीय पंचायत व्यवस्था लोकाभिमुख करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना संवैधानिक बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. ग्रामीण स्तरावर सत्तापक्षाचे प्राबल्य वाढविण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका जराते यांनी केली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत