लोहखनिजाची वाहतूक तत्काळ थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2016 01:46 IST2016-04-13T01:46:05+5:302016-04-13T01:46:05+5:30
तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्पामधून कच्च्या स्वरूपातील लोह खनिजाची जिल्ह्याबाहेर होणारी वाहतूक .....

लोहखनिजाची वाहतूक तत्काळ थांबवा
खासदारांना निवेदन : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
एटापल्ली : तालुक्यातील सूरजागड लोह प्रकल्पामधून कच्च्या स्वरूपातील लोह खनिजाची जिल्ह्याबाहेर होणारी वाहतूक तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी एटापल्ली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खा. अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात राकाँचे एटापल्ली तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांच्या नेतृत्वात खा. अशोक नेते यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील एकमेव सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच होईल, असे स्थानिक जनतेला वाटले होते, तसे लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना आश्वासने देण्यात आले होते. मात्र लिजधारक कंपनीने एटापल्ली येथे प्रकल्प न उभारता येथील कच्चे खनिज (दगड) पुर्व ठाणे येथे वाहतूक करीत आहेत. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात सूरजागड प्रकल्प होणार नाही, असे स्पष्ट होत आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिक जनतेचा मोठा विश्वासघात झाला असून बेरोजगार रोजगारापासून वंचित राहणार आहेत. निवेदन देताना रायुकाँ अध्यक्ष संदीप जोशी, अभय पुण्यप्रेडिवार, विनोद पत्तीवार, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, संभा हिचामी, प्रसाद नामेवार, अजय अतकमवार आदी उपस्थित होते.