आंधळी, नवरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:36 IST2021-09-13T04:36:00+5:302021-09-13T04:36:00+5:30
कुरखेडा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नवरगाव येथे खुलेआम एका व्यक्तीकडून अवैध दारू विक्री होत असल्याने ...

आंधळी, नवरगाव येथील अवैध दारू विक्री बंद करा
कुरखेडा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नवरगाव येथे खुलेआम एका व्यक्तीकडून अवैध दारू विक्री होत असल्याने गावातील शांतता भंग होत आहे. त्यामुळे येथील अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
मागील दोन महिन्यांपासून गावात दारू विक्री होत असल्याने त्यांचा परिणाम गावातील युवावर्ग व बालगोपालांवर पडू लागल्याने गावातील नागरिकांनी माराई देवस्थान नवरगाव येथे ग्रामसभा बोलवून गावातील दारू बंद करण्यासाठी ठराव पारित केला, तसेच दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीला समज देऊन दारू बंद करा, अशा सूचनाही देण्यात आल्या. गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन कुरखेडा येथे नवरगावातील दारू बंद करा व विक्रेत्यावर कायदेशीर कार्यवाही करा यासंदर्भात पोलीस स्टेशन, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना लेखी तक्रार दिली आहे. मात्र, दोन महिने उलटूनही दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होत नसल्याने आंधळी व नवरगाव येथील समस्त महिलावर्ग व गावकरी आंदाेलन करतील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.