विद्युत निर्मिती कारखान्यामुळे होणारे प्रदूषण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:46+5:302021-07-15T04:25:46+5:30
निवेदनात म्हटले आहे की, देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा वाॅर्डालगत असलेल्या ए. ए. एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विद्युत निर्मिती ...

विद्युत निर्मिती कारखान्यामुळे होणारे प्रदूषण थांबवा
निवेदनात म्हटले आहे की, देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या जुनी वडसा वाॅर्डालगत असलेल्या ए. ए. एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विद्युत निर्मिती कारखान्यात जाळण्यात येत असलेला कोंडा व दगडी कोळशामुळे चिमणीतून उत्सर्जित धुरात मोठ्या प्रमाणात राखमिश्रित कण आढळून येत असून, हवेच्या प्रवाहासोबत राखेचे कण वाहत शहराच्या अनेक वाॅर्डातील घरात ढीग स्वरुपात साचत आहे. उत्सर्जित राखेमुळे जल प्रदूषण व वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. हवेच्या प्रवाहाबरोबर राखमिश्रित धुळीचे कण परिसरातील नागरिकांसाठी धोक्याचे ठरू लागले आहेत. यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यातून उत्सर्जित होणारे वायू प्रदूषण तत्काळ थांबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते डाकराम वाघमारे, नासीर जुम्मन शेख, संतोष बहादुरे, शंकर बेदरे, देविदास सावरकर, अक्षय कुंदनवार, नामदेव मेश्राम उपस्थित होते.
130721\4019img-20210713-wa0058.jpg
उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देतांना