कृषिपंपांची सक्तीची वसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:17+5:302021-02-17T04:43:17+5:30
चामाेर्शी : तालुक्यातील कृषी वीजपंपधारकांना कोणत्याही प्रकारचे वीजबिल न देता, त्यांच्या वीज मीटरची रिडिंग न घेता वीजवितरण कंपनीकडून ...

कृषिपंपांची सक्तीची वसुली थांबवा
चामाेर्शी : तालुक्यातील कृषी वीजपंपधारकांना कोणत्याही प्रकारचे वीजबिल न देता, त्यांच्या वीज मीटरची रिडिंग न घेता वीजवितरण कंपनीकडून सक्तीची वसुली केली जात आहे. तसेच वीजबिल न भरल्यास पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली जात आहे. हा प्रकार गंभीर असून, सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा सपाटा लावला आहे. कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले हाेते. तरी सुद्धा शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याची धमकी देणे याेग्य नाही. या संदर्भात आपण शासनाकडे विनंती करू, असे आश्वासन आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी शेतकऱ्यांना दिले.