सूरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:35 AM2021-05-15T04:35:15+5:302021-05-15T04:35:15+5:30

निवेदनात म्हटले आहे की, २८ एप्रिल २०२१ राेजी पुरसलगोंदी ग्रामपंचायतने ठराव घेऊन त्रिवेणी अर्थमुव्हर्स या कंपनीला शासनाने सूरजागड पहाडीवरील ...

Stop excavation on Surjagad hill | सूरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा

सूरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा

Next

निवेदनात म्हटले आहे की, २८ एप्रिल २०२१ राेजी पुरसलगोंदी ग्रामपंचायतने ठराव घेऊन त्रिवेणी अर्थमुव्हर्स या कंपनीला शासनाने सूरजागड पहाडीवरील लोहदगड उत्खनन करुन वाहतूक करण्यास मंजुरी दिली. परंतु शासन व कंपनीने कायदेशीर ग्रामस्थांची पूर्वपरवानगी घेतली नाही. वनसंवर्धन अधिनियम १९८० व पर्यावरण अधिनियम १९८६ चे अनुपालन करण्यात आले नाही. तसेच पुनर्वसन आराखडा व इतर कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता ग्रामसभा व स्थानिक लोकांना अंधारात ठेवून मंजुरी दिली. आदिम जमातीची संस्कृती व नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याकरिता सूरजागड येथे सुरू असलेले लाेहखनिज उत्खननाचे काम लवकर बंद करावे, असा ठराव पुरसलगाेंदी येथे घेण्यात आला. ग्रामसभेच्या ठरावातील सर्व मुद्द्यांचा विचार करून उत्खननाचे काम बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना निवेदन देताना उपसरपंच राकेश कवडो, सदस्य मधुकर सडमेक, दयालू कुजूर, अजय सडमेक, निर्मला गुंडम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित हाेते.

===Photopath===

140521\14gad_6_14052021_30.jpg

===Caption===

तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना निवेदन देताना पुरसलगाेंदीचे नागरिक.

Web Title: Stop excavation on Surjagad hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.