एसटीचे स्टेअरिंग जाणार नवीन चालकांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST2022-01-16T05:00:00+5:302022-01-16T05:00:30+5:30
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा सुरू झाली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, यासाठी शासनाने वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, अजूनही काही कर्मचारी आंदाेलनात कायम आहेत. शासनाने नवीन चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.

एसटीचे स्टेअरिंग जाणार नवीन चालकांच्या हाती
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटीमध्ये नवीन चालकांची भरती करण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये नवीन चालक रुजू झाले आहेत. गडचिराेली विभागीय कार्यालयाने ५० चालकांची मागणी एसटी व्यवस्थानाकडे केली आहे. नवीन चालक लवकरच रुजू हाेतील अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी मागील अडीच महिन्यांपासून काही एसटी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत. शासनाने पगारवाढ केल्यानंतर काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील २५० एसटी आगारांपैकी २१५ आगारांमध्ये अंशत: एसटीची सेवा सुरू झाली आहे. आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावे, यासाठी शासनाने वेळाेवेळी आवाहन केले. मात्र, अजूनही काही कर्मचारी आंदाेलनात कायम आहेत. शासनाने नवीन चालकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर या प्रत्येक विभागामध्ये ५० नवीन चालकांची नियुक्ती केली आहे. काही चालक रुजू झाले आहेत. गडचिराेली एसटी विभागातही नवीन चालक रुजू हाेण्याची शक्यता आहे.
गडचिराेली आगारात पाच बसेस सुरू
गडचिराेली आगारात पाच चालक व तेवढेच वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाच बस सुरू आहेत. अहेरी आगारात एक बस सुरू आहे. मात्र अजून गर्दीच्या मार्गावर बसगाड्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे नवीन चालक रूजू हाेताच त्या फेऱ्या धावतील.
आंदाेलनकर्त्यांचे मन वळविणे सुरूच
ज्या कर्मचाऱ्यांवर काेणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यांनी रुजू व्हावे यासाठी एसटीचे अधिकारी त्यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विलीनीकरणाचे भूत अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनातून निघाले नसल्याने ते कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत.
आंदाेलकांमध्ये अस्वस्थता
शासन नवीन भरती करणार नाही, असे आंदाेलनकर्त्या कर्मचाऱ्यांना वाटत हाेते. मात्र, शासनाने नवीन भरती करण्यास सुरुवात केली आहे. नवीन चालक रुजू हाेत आहेत. कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार की नाही, हे अजूनही शासनाने स्पष्ट केले नाही. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.