शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

एसटीचे वायफाय ठरले मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय लावण्यात आले आहे. मात्र सदर वायफाय बºयाचवेळा सुरू होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याने वायफाय केवळ देखावा असल्याचा....

ठळक मुद्देगडचिरोली आगारातील स्थिती : सुरू होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय लावण्यात आले आहे. मात्र सदर वायफाय बºयाचवेळा सुरू होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याने वायफाय केवळ देखावा असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.प्रवाशी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक बदल केले आहेत. एसटीमध्ये प्रवास करताना प्रवाशांना करमणुकीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभरातील सर्वच बसेसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गडचिरोली आगारातील एकूण ११० बसेसपैकी ६० बसेसला दोन महिन्यांपूर्वी वायफाय बसविण्यात आले आहे. वायफायची सुविधा म्हटल्यानंतर आपला मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट होईल, असा प्रवाशांचा अंदाज होता. मात्र सदर वायफायचा इंटनेट कनेक्टीव्हीटीसोबत काहीच संबंध नाही.मोबाईलचा वायफाय सुरू केल्यानंतर ‘वुड डॉट कॉम’ या साईटवरून काही निवडक हिंदी व मराठी चिपत्रट, कॉमेडी दिसतात. बºयाच बसेसमधील वायफाय उघडत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. ज्या एसटीमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध आहे. अशा एसटीमध्ये सूचनाफलक लावला असून वायफाय कसा उघडण्यात यावा याबाबत सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन करून वायफाय उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर बºयाचवेळा वायफाय उघडत नाही. त्यामुळे प्रवाशांची निराशा होते. काही प्रवासी वाहकाला वायफाय कसे उघडावे, याबाबत विचारणा करतात. मात्र काही वाहकांना याबाबतचे ज्ञान नसल्याचे दिसून येते. आपल्याला वायफायबाबत काहीच माहित नसल्याचे उत्तर वाहकांकडून दिले जात आहे. तांत्रिक अज्ञानामुळे सुविधा उपलब्ध असूनही प्रवाशांना मनोरंजनापासून वंचित राहावे लागत आहे. दरदिवशी तेच ते मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू होत असल्याने दरदिवशी प्रवास करणाºया प्रवाशांसाठी सदर कार्यक्रम कंटाळवाणे ठरत आहेत. त्यामुळे काही कालावधीनंतर वायफायमधील कार्यक्रमांमध्ये बदल करावा. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची संख्या वाढवावी, जेणेकरून पर्यायी कार्यक्रमांची संख्या वाढण्यास मदत होईल, अशी मागणी आहे.इंटरनेट सुविधेची मागणीवायफाय म्हटल्यावर आपला मोबाईल इंटरनेशी कनेक्ट होईल, असा सर्वसाधारण समज प्रवाशांचा होतो. मात्र सदर वायफाय इंटरनेशी कनेक्ट होत नाही. तर एसटीच्या वायफायमध्ये जेवढे मनोरंजनात्मक कार्यक्रम टाकलेले आहेत तेवढेच बघता येतात. त्यामुळे प्रवाशांची निराशा होते. वायफायच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटशी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.पहिल्या टप्प्यात गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय बसविण्यात आले आहे. अपवाद वगळता सर्वच बसेसमधील वायफाय उघडतात. काही कालावधीनंतर वायफायमधील मनोरंजनात्मक कार्यक्रम बदलविले जातात. वायफायच्या माध्यमातून मनोरंजनाची सुविधा झाल्याने लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.- विनेश बावणे,एसटी आगार प्रमुख, गडचिरोली