शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

रेल्वेमार्ग रखडण्यास राज्य सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 5:00 AM

२०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाचे काम कुठे अडले? याबाबत लोक मला विचारत आहेत. पण, हे काम राज्य सरकारमुळेच अडले आहे. सरकारने या कामाच्या वाढलेल्या किमतीचा ५० टक्के वाटा उचलण्याबाबतचे संमतीपत्रच दिले नाही. ते मिळाले असते तर केंद्राने  आपल्या वाट्यातील काही निधी तातडीने देऊन हे काम सुरू केले असते, असा दावा गडचिरोली-चिमूरचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषेदत त्यांनी सध्या ऐरणीवर असलेल्या रेल्वेच्या मुद्द्यावर आपले स्पष्टीकरण दिले. खा. नेते म्हणाले, मी १९९९ मध्ये आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाबाबत अशासकीय ठराव मांडून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हापासून माझा या मुद्द्यावरील पाठपुरावा सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यासंदर्भातील प्रस्ताव घेऊन आमचे एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेले होते. त्यांना या जिल्ह्यात रेल्वेची गरज का आहे हे पटवून दिले. त्यांनी रेल्वेमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. २०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही. त्यावर तोडगा म्हणून वन्यप्राण्यांसाठी अंडरपास (भुयारी मार्ग) न ठेवता रेल्वेमार्गच उड्डाणपुलावरून करण्याचे सूचविले आहे. या कामाचा खर्च आता वाढून तो १०९६ कोटीवर पोहोचला आहे, असे   खासदार  नेते  म्हणाले. पत्रपरिषदेला अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, रमेश भुरसे, जि.प.सभापती रंजिता कोडापे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल पोहणकर, वर्षा शेडमाके, जनार्धन साखरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावेया कामासाठी राज्य शासनाने खर्चाचा ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे. राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे ५७८ कोटी निधी देण्यासंबंधीचे संमतीपत्र द्यावे आणि हे काम सुरू करण्यासाठी ७७ कोटी तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी खा.नेते यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांना दोन वेळा विनंती केली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी केली असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खा.नेते यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेrailwayरेल्वे