आलापल्ली-एटापल्ली मार्गाचे काम सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:27+5:302021-05-27T04:38:27+5:30
याबाबत एसडीओला निवेदन देण्यात आले. यात म्हटल्यानुसार, तत्कालीन पालकमंत्री अब्रीशराव आत्राम यांनी त्यावेळी रस्ता कामाकरिता १३७ कोटी रुपये मंजूर ...

आलापल्ली-एटापल्ली मार्गाचे काम सुरू करा
याबाबत एसडीओला निवेदन देण्यात आले. यात म्हटल्यानुसार, तत्कालीन पालकमंत्री अब्रीशराव आत्राम यांनी त्यावेळी रस्ता कामाकरिता १३७ कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगून येत्या १० दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन एटापल्लीत येऊन दिले होते; पण तब्बल अडीच वर्षे उलटूनही सदर रस्ता कामाला सुरुवात झाली नाही.
रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जड वाहतुकीस परवानगी देऊ नये, अन्यथा पुन्हा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असे निवेदन तालुका अन्याय विरोधी संघर्ष समिती एटापल्लीच्यावतीने उपविभागीय अधिकारी मनुज जिंदाल यांना देण्यात आले. यावेळी महेश पुल्लुरवार, प्रज्योत बल्लेवार, संदीप सेलोटकर, सुरेश बारसागडे, उमेश संगर्ती, अभय पुण्यमूर्तीवार व अनेक जण उपस्थित होते, तसेच रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा लोहखाणीचे काम बंद करा, अशा मागणीचे निवेदन तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन नामेवार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.