उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करा
By Admin | Updated: May 12, 2014 23:40 IST2014-05-12T23:40:12+5:302014-05-12T23:40:12+5:30
जिल्ह्यात लागवड करण्यात आलेले उन्हाळी धान पीक निघाले असल्याने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नंदू नरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यात लागवड करण्यात आलेले उन्हाळी धान पीक निघाले असल्याने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नंदू नरोटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आरमोरी व देसाईगंज तालुक्यात उन्हाळी धान पिकाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सदर धान पीक आता निघाले आहे. मात्र शासनाने अजुनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने शेतकर्यांना धान व्यापार्यांना विकावे लागत आहे. धान खरेदी केंद्र सुरू नसल्याचा फायदा उचलत व्यापारी वर्ग अत्यंत कमी किंमतीत धान खरेदी करीत आहेत. मागील रबी हंगामात धान खरेदी केंद्र सुरू केले होते. मात्र यावर्षी अजुनपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने व्यवहार ठप्प पडले आहेत. खरीप हंगामाच्या लागवडीसाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी मिळेल त्या भावात धान विकत आहेत. विशेष करून दुर्गम भागातील शेतकर्यांचे व्यापारी वर्गाकडून लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, मोहन पुराम, उपसरपंच विलास बन्सोड, o्रावण बुल्ले, जिल्हाध्यक्ष दिलीप उसेंडी, रोहित वड्डे, बंडू हलामी यांच्यासह बहुसंख्य शेतकर्यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (नगर प्रतिनिधी)