नर्सिंग प्रशिक्षणाचे क्रॅश काेर्स सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:38 IST2021-05-08T04:38:45+5:302021-05-08T04:38:45+5:30
अंकित गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने युवक-युवतींना २० दिवसांचा नि:शुल्क नर्सिंग क्रॅश कोर्स सुरू केला ...

नर्सिंग प्रशिक्षणाचे क्रॅश काेर्स सुरू करा
अंकित गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारने युवक-युवतींना २० दिवसांचा नि:शुल्क नर्सिंग क्रॅश कोर्स सुरू केला तर कोर्समध्ये इंजेक्शन्स, व्हेंटिलेटरवर रुग्ण कसे जोडावे याबद्दल मूलभूत ज्ञान मिळेल. ऑक्सिजन कसा द्यावा आणि सर्व मूलभूत गरजा व व्हेंटिलेटरवर रुग्णाला कसे ठेवले पाहिजे याबाबत माहिती मिळेल. कोविड संकटकाळात नर्स आणि डॉक्टरांवर असलेला भार कमी करण्यास यामुळे मदत होईल.
सदर ट्विटची आमदार डॉ. देवराव होळी यांनी दखल घेऊन थेट मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांना पत्र पाठविले. सदर पत्रात, डाॅक्टरांसह, नर्स व अन्य आराेग्य कर्मचाऱ्यांना व्हेंटिलेटर व अन्य मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक तालुका स्तरावरून प्रशिक्षणासाठी युवांची निवड करावी, अशी मागणी डाॅ. हाेळी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.