अमिर्झात कोविड केअर केंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:58+5:302021-04-25T04:35:58+5:30

कोरोना विषाणूने जगात, देशात आणि राज्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. गाव पातळीवरही काेराेनारचे रुग्ण आढळून येत आहेत. अमिर्झा ...

Start Covid Care Center in Amirzat | अमिर्झात कोविड केअर केंद्र सुरू करा

अमिर्झात कोविड केअर केंद्र सुरू करा

कोरोना विषाणूने जगात, देशात आणि राज्यात अक्राळ-विक्राळ रूप धारण केले आहे. गाव पातळीवरही काेराेनारचे रुग्ण आढळून येत आहेत. अमिर्झा प्राथमिक आरोग्य केंद्रात अमिर्झा गावासहीत धुंडेशिवणी, पिपरटोला, कळमट़ोला, भिकारमौशी ,बोथोडा, आंबेटोला, चांभार्डा, मरेगांव, मौशीखांब, खातेडा, मुरमाडी, गिलगाव, खुर्सा अशा अनेक गावांचा समावेश आहे. या गावांमधील रुग्णांसाठी प्रशासनाने २५ बेडचे सुसज्ज व सर्वसोयींयुक्त असे काेविड केअर केंद्र अमिर्झा येथे सुरू करावे.

अमिर्झा येथे उपचाराची साेय नसल्याने या परिसरातील रुग्णांना गडचिराेली येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. या रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास अडचण जात आहे. अमिर्झात उपचार केंद्र सुरू झाल्यास जिल्हा रुग्णालयावरील भार कमी हाेण्यास मदत हाेईल. याबाबतचे निवेदन डाॅ. खाेब्रागडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Web Title: Start Covid Care Center in Amirzat