कुरुडमधील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:29+5:302021-05-27T04:38:29+5:30
कुरूड : ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरूड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पाटील माेहल्ल्यातील गजानन बाबा मंदिरात कोरोना ...

कुरुडमधील लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुरूड : ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरूड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पाटील माेहल्ल्यातील गजानन बाबा मंदिरात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी गावातील अनेकांनी लस घेतली. सरपंच प्रशाला गेडाम यांनी लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती केली हाेती तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शेडमाके यांनाही गृहभेटी देण्याबाबत सांगितले हाेते. त्यानुसार ग्रामस्थांनी प्रतिसाद देत लस घेतली. या शिबिराला सरपंच प्रशाला गेडाम, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम, डॉ. प्रवीण शेडमाके, डॉ. अश्विनी कुथे, औषध निर्माण अधिकारी गिरीधर ठाकरे, एलएसओ दत्तात्रय निमजे, परिचारिका सुनीता उईके, गीता फुलबांधे, आराेग्य सहाय्यक नारायण गेडाम, वासुदेव कुलसे तसेच महादेव ढोरे, पिंटू पारवेकर, रमेश ठाकरे, प्रभाकर उरकुडे, मधुकर लाभे उपस्थित होते.