धानोरा - तालुक्यातील पेंढरी क्षेत्रातील कामथळा येथे जय गडमाता क्रीडा मंडळ, कामथळाच्यावतीने भव्य कड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दाेन्ही स्पधा मिळून एकूण ८५ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन गाव भूमिया लालसाय गावडे यांच्याहस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, माजी सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पं. स.चे माजी सदस्य परसराम पदा, उपसरपंच देवसाय गावडे, संजय गावडे, माजी उपसरपंच पप्पू येरमे, परमेश गावडे, रूपेन नाईक, शिक्षक वडालकोंडावार, सय्यद, समर्थ व त्या भागातील ज्येष्ठ नागरिक, गावपाटील उपस्थित होते. आदिवासी वेशभूषेत ढोल व आदिवासी संस्कृतीनुसार पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी उपस्थित खेळाळूंना मार्गदर्शन केले.
कामथळातील कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:09 IST