दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: October 21, 2015 01:29 IST2015-10-21T01:29:01+5:302015-10-21T01:29:01+5:30
लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ, उमंग आर्ट कल्चरल अॅन्ड फिजीकल क्लब यांच्या सहकार्याने सोमवारी दांडिया स्पर्धा घेण्यात आली.

दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवाई ग्रुप प्रथम : लोकमत समूह व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित स्पर्धा
गडचिरोली : लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ, उमंग आर्ट कल्चरल अॅन्ड फिजीकल क्लब यांच्या सहकार्याने सोमवारी दांडिया स्पर्धा घेण्यात आली. या दांडिया स्पर्धेत शिवाई ग्रुपने प्रथम क्रमांक मिळवून नागपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजेश कात्रटवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बंडू शनिवारे, नितीन कामडी, अॅड. संजय भट, प्रा. उके, अविनाश बट्टूवार, जि. प. सदस्य छायाताई कुंभारे, चारूताई नंदनवार, सखी मंचच्या संयोजिका प्रीती मेश्राम, युवा नेक्स्ट संयोजिका वर्षा पडघन उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात लोकमत समूहाचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा व दिवंगत कमलताई कात्रटवार यांच्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाई गु्रप गडचिरोली, द्वितीय क्रमांक जय माता दी ग्रुप गडचिरोली, तृतीय क्रमांक युवा शक्ती ग्रुप यांनी पटकाविला. बेस्ट परफारमंसचे बक्षीस शिवाजी महाराजांचे पात्र साकारणाऱ्या युवकाला देण्यात आले. प्रथम क्रमांक स्व. कमलाताई कात्रटवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २५०१ , द्वितीय १५०१, तृतीय १००० रूपये रोख बक्षीस देण्यात आले. नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व उमंग आर्ट कल्चरल अॅड फिजीकल क्लब यांच्या वतीने प्रत्येक स्पर्धकाला मेडल देण्यात आले. लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या वतीने ढाल देऊन गौरविण्यात आले.
शिवाई ग्रुपच्या शिवाजी महाराजांचे पात्र सादर करणाऱ्या युवकाला इन्स्पायर एज्युकेशन अॅकॅडमी व अमन या बाल कलाकाराला उमंग आर्टच्या वतीने रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. छायाताई कुंभारे यांनी स्वत: १ हजार रूपयांचे बक्षीस शिवाई ग्रुपला दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. राजेश कात्रटवार यांनी पुढील वर्षी दांडिया गुु्रपच्या स्पर्धकांसाठी चांगले मंच उपलब्ध करून देण्यात येईल, युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपले मंडळ नेहमीच सहकार्य करेल, असा आशावाद व्यक्त केला. (नगर प्रतिनिधी)