धानोरा: भरधाव दुचाकी बाकावर धडकली, एक युवक ठार, दुसरा गंभीर
By मनोज ताजने | Updated: October 17, 2022 10:01 IST2022-10-17T09:59:57+5:302022-10-17T10:01:14+5:30
दुचाकीची सिमेंटच्या बाकाला धडक लागून एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.

धानोरा: भरधाव दुचाकी बाकावर धडकली, एक युवक ठार, दुसरा गंभीर
धानोरा (गडचिरोली): दुचाकीची सिमेंटच्या बाकाला धडक लागून एक युवक ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना १६ ऑक्टोबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास येथील स्टेट बँकेसमोर घडली.
आकाश राजेंद्र नरोटे (२५ वर्ष) राहणार रामनगर वार्ड क्रमांक १९, गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे, तर इस्माईल पठाण (२४ वर्ष) राहणार इंदिरानगर, गडचिरोली असे गंभीर जखमीचे नाव आहे.हे दोघे युवक एमएच ३३ एइ ४४८५ क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीकडे जात असताना संतुलन बिघडल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बाकावर आदळली.
दोघांनाही धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान रात्री आकाशचा मृत्यू झाला. गंभीर जखमी इस्माईल याला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. या अपघाताबाबत अधिक तपास धानोरा पोलीस करत आहेत.