दिवाळी सुट्यांमध्ये विशेष गृहपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:43+5:30
धानोरा तालुक्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध कृतींमधून अध्ययन व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा, सदर गृहपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याचे शाळास्तरावर जतन करावे तसेच पंचायत समिती व कैैवल्य एज्युकेश फाऊंडेशनच्या पर्यवेक्षीय यंत्रणेने भेट दिल्यानंतर सदर उपक्रमांचे दस्तावेज शाळांनी उपलब्ध करावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमखांना दिल्या आहेत.

दिवाळी सुट्यांमध्ये विशेष गृहपाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : दिवाळीच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये, अध्ययनातील सातत्य टिकून राहावे, यासाठी धानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तसेच कैैवल्य एज्युकेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने गृहपाठ देण्यात आला आहे. दिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थी गणित, मराठी, इंग्रजी विषयातील विविध संबोधांचे स्पष्टीकरण शिकणार आहेत.
धानोरा तालुक्यातील सर्व जि. प. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी दिवाळीच्या सुट्यांमध्ये विविध कृतींमधून अध्ययन व्हावे, यासाठी सदर उपक्रम राबविला जात आहे. सुट्यांमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यावा, सदर गृहपाठ विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्यानंतर त्याचे शाळास्तरावर जतन करावे तसेच पंचायत समिती व कैैवल्य एज्युकेश फाऊंडेशनच्या पर्यवेक्षीय यंत्रणेने भेट दिल्यानंतर सदर उपक्रमांचे दस्तावेज शाळांनी उपलब्ध करावेत, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमखांना दिल्या आहेत.
या माध्यमातून तालुक्यातील जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात सातत्त्य व नियमितता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक केले जात आहे.
या संबोधांवर राहणार अधिक भर
दिवाळी सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना गणित, मराठी व इंग्रजी विषयावरील विविध संबोध स्पष्ट करण्याबाबत गृहपाठ देण्यात आला आहे. यामध्ये गणित विषयातील १ ते १०० पर्यंतच्या संख्या अंकात व अक्षरात लिहिणे, दररोज दोन ते २० पर्यंतचे पाढे लिहिणे, दररोज बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आदींची प्रत्येकी पाच उदाहरणे सोडविणे. मराठी विषयासाठी दररोज अ ते ज्ञ पर्यंत बाराखडी लिहिणे, दररोज समानार्थी, विरोधार्थी, जोडाक्षरे प्रत्येकी पाच शब्द लिहिणे व वाचने, तसेच पाच ओळी शुद्धलेखन करून वाचणे. इंग्रजी विषयासाठी दररोज ए ते झेड पर्यंतचे अक्षर वाचणे व लिहिणे, पाच इंग्रजी शब्द वाचणे, विविध विषयावर दररोज पाच ओळी इंग्रली लेखन करून वाचणे, दररोज एक गोष्ट वाचणे, पाच ओळी शुद्धलेखन करणे.