जागेचा तिढा कायम

By Admin | Updated: October 11, 2015 02:28 IST2015-10-11T02:28:01+5:302015-10-11T02:28:01+5:30

रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे.

The space was shortened | जागेचा तिढा कायम

जागेचा तिढा कायम

वडसा एमआयडीसी : पशुसंवर्धन विभागाला द्यावे लागणार २१.२४ कोटी रूपये
गडचिरोली : रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या वडसा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी सध्या पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेली विसोरा परिसरातील २०० हेक्टर आर जमीन एमआयडीसी विभागाने मागितली आहे. सदर जागा मिळविण्यासाठी शासनाला एनपीव्हीपोटी पशुसंवर्धन विभागाला २१.५४ कोटी रूपये अदा करावी लागणार आहे. तसा प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला आहे.
मोठी बाजारपेठ व रेल्वेमार्ग उपलब्ध असलेल्या देसाईगंज येथे औद्योगिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रयत्न सुरू केले आहे. याकरिता महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विसोरा भागात जाऊन जागेचा शोध घेतला. देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे ४५९.०६ हेक्टर आर. संरक्षित वनजमिनीपैकी २०० हेक्टर आर जमीन विनावापर असल्याचे दिसून आले. सद्य:स्थितीत विसोरातील बदक पैदास केंद्रालगत असलेली ही जागा पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याच परिसरातील २८ हेक्टर क्षेत्र जमीन एसआरपीएफला हस्तांतरीत केली आहे. प्रादेशिक अधिकारी नागपूर यांनी १० जुलै २०१५ रोजी उपवनसंरक्षक वडसा यांचेसोबत विनावापर असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या २०० हेक्टर जागेची पाहणी करून निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात सभा घेण्यात आली. या सभेत सदर जागा हस्तांतरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. निर्वणीकर प्रस्ताव सादर करून वन जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी वनिकरणाकरिता १०.७७ लक्ष प्रती हेक्टर दराने २०० हेक्टर जमिनीकरिता २१.२४ कोटी रूपये एनपीव्ही भरावा लागेल, असे उपवनसंरक्षक वडसा यांनी औद्योगिक विकास महामंडळास कळविले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्वणीकरण प्रस्ताव सादर करून शासनाने याकरिता एनपीव्हीचा निधी उपलब्ध करून मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्य शासन यावर काय निर्णय घेते याकडे देसाईगंजसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The space was shortened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.