शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे उत्पादन कमालीचे घटणार

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत.

गडचिरोली : उशीरा झालेली पेरणी, रोगांचा प्रादुर्भाव व पावसाने दिलेला दगा यामुळे सोयाबीन पिकाचे पाहिजे त्या प्रमाणात पोषण झाले नाही. परिणामी सोयाबीनला अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. त्याचबरोबर दाण्यांचा आकारही अत्यंत लहान असल्याने सोयाबीन उत्पादनात यावर्षी कमालीची घट होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतित आहे. १० वर्षापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाची अजिबात ओळख नव्हती. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात या पिकाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. त्याचबरोबर कोरडवाहू व हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेता येत असल्याने आजपर्यंत ज्या जमिनी सिंचनाची सुविधा नसल्याने पडीत होत्या. त्या जमिनीमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाऊ लागले. यावर्षी जिल्ह्यात ३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अगदी सुरूवातीलाच महिनाभर पाऊस पडला नाही. त्यामुळे सोयाबिनची पेरणी महिनाभराने उशीरा झाली. त्यानंतरही पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनचे पीक करपायला लागले होते. पाण्याअभावी पीक कमजोर झाले व दमट वातावरण यामुळे प्रचंड प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर झाल्याने झाडांना अत्यंत कमी प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. काही झाडांना तर एकही शेंग लागली नाही. दाणेसुद्धा पूर्णपणे परिपक्व झाले नसल्याने त्यांचा आकार अत्यंत लहान आहे. त्यामुळे एकरी एक ते दोन क्विंटल एवढेच उत्पादन होण्याची शक्यता आहे. एवढ्या उत्पादनात लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. मागील वर्षीही कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते.