शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

यंत्राद्वारे रबी हंगाम पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

कोरची तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून रबी पिकाची लागवड करतात. परंतु बियाणे फेकून पेरणी केल्याने बरेचशे बियाणे वापत नाही. तसेच रोपांची संख्याही कमी होते. उत्पादनात घट येते. यावर्षी खरीप हंगामात उशिरापर्यंत पाऊस आल्याने जमिनीत पुरेसा ओलावा आहे.

ठळक मुद्देकृषी विभाग व आत्माचा पुढाकार : कोरची तालुक्यात प्रथमच उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. पेरणीपासून मळणीपर्यंत व मशागतीची कामे यंत्राद्वारे केली जात आहेत. कोरची तालुक्यातही शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्या पुढाकाराने तालुक्यात पहिल्यांदाच पेरणी यंत्राद्वारे रबी हंगामात बियाण्यांची पेरणी करण्यात आली.कोरची तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून रबी पिकाची लागवड करतात. परंतु बियाणे फेकून पेरणी केल्याने बरेचशे बियाणे वापत नाही. तसेच रोपांची संख्याही कमी होते. उत्पादनात घट येते. यावर्षी खरीप हंगामात उशिरापर्यंत पाऊस आल्याने जमिनीत पुरेसा ओलावा आहे. रबी पिकाचे क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने तालुक्यात रबी हंगामातील बियाण्यांची पेरणी केली जात आहे.तालुक्यातील मुलेटीपदीकसा, खुर्सीपार, हितकसा आदी गावातील २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, जवस पिकाची पेरणी यंत्राद्वारे करण्यात आली. इतर गावांमध्येही यंत्राणे पेरणी केली जात आहे. त्यामुळे बियाण्यांची बचत होऊन ठरावित अंतरावर पेरणी करण्यास मदत मिळते. बियाणे जमिनीत ठराविक खोलीपर्यंत जात असल्याने बी रूजण्याचे प्रमाण तसेच रोपांची संख्या अधिक होते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनातही वाढ होते. तालुक्यातील अनेक शेतकरी यंत्राद्वारे पेरणी करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे वेळ व मानवी श्रमाची बचत होत आहे. सदर उपक्रम राबविण्याकरिता तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, विषयतज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. के. जनबंधू, एच. एम. रावटे यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :agricultureशेती