चामाेर्शी तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर आवत्या पद्धतीने पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:27+5:302021-07-23T04:22:27+5:30

शेतकरी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत होते. रोवणीसाठी लागणारा मशागतीचा खर्च दरवर्षी वाढत चालला ...

Sowing on 60% of the area in Chamarshi taluka | चामाेर्शी तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर आवत्या पद्धतीने पेरणी

चामाेर्शी तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर आवत्या पद्धतीने पेरणी

शेतकरी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत होते. रोवणीसाठी लागणारा मशागतीचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेताची नांगरणी, वखरणी करीत. यासाठी गावागावांत जनावरे दिसून यायची. मात्र, गेल्या दहा वर्षांत बैलजोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतपत झाली. जनावरांची देखभाल करणे शेतकऱ्यांना कठीण जात होते. तसेच जनावरांच्या किमती वाढत चालल्याने शेतकऱ्यांना बैलजोडी वापरणे कठीण झाले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे दोन-तीन बैलजोड्या असायच्या ते शेतकरी बैलजोडीविना धानाचे उत्पादन घेऊ लागले आहेत. बैलजोडीऐवजी शेतकरी ट्रॅक्टर खरेदीकडे वळले आहेत. ट्रॅक्टरला गावात हंगामी स्वरूपात रोजगार मिळू लागल्याने आजच्या घडीला साधारण गावातसुद्धा दहा-बारा ट्रॅक्टर सहज दिसून येतात. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतातील नांगरणी, वखरणी, चिखलणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. परंतु, इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टर भाडे ९०० ते १००० रुपये प्रति तासांवर पाेहाेचले. त्यामुळे रोवणी खर्चाची बचत करून धान पिकांचे उत्पादन घेता येते, ही बाब हेरून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धान पिकाची लागवड केली आहे. किमान एक वर्ष आवत्या पद्धतीने धान पीक लागवड करून पाहू म्हणत शेतकरी आवत्या पद्धतीकडे वळले आहेत. सध्या आवत्या धान पीक जाेमात असल्याने शेतकरी आनंदित आहे.

बॉक्स

शेतमजुरांची अडचण

शेतातील धान रोवणी करण्यासाठी गावातील शेतमजूर रोवणी कामाकरिता पूर्वी आठवडा पद्धतीने धानाचा व पैशाचा मोबदला देत असत. मात्र, आता यात बदल झाला असून रोवणी काम आता एकराप्रमाणे ठेका पद्धतीने मजूर करू लागले आहेत. रोवणी हंगाम किमान महिनाभर चालत असे. यातूनच एक मजूर साधारण दहा हजार रुपये सहज कमवीत असे. यातून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. मात्र, रोवणी क्षेत्र कमी झाल्याने शेतमजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

220721\img-20210715-wa0141.jpg

आवत्या धान पिकाचे फोटो

Web Title: Sowing on 60% of the area in Chamarshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.