उन्हाळा लागताच वीज चाेरी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:17+5:302021-05-03T04:31:17+5:30
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले देसाईगंज : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाले कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. ओपन स्पेसही ...

उन्हाळा लागताच वीज चाेरी वाढली
नाल्यांचा उपसा नाही, डास वाढले
देसाईगंज : शहरातील बहुतांश वाॅर्डांतील नाले कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरले आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व कीटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने फवारणी करून डास व कीटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
दूध शीतकरण केंद्राचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नागेपल्ली व कनेरी येथे राज्य शासनाचे दूध शीतकरण केंद्र आहे. मात्र, दुधाचे पुरेसे उत्पादन जिल्ह्यात नसल्याने हे शीतकरण केंद्र सध्या बंद आहे. नव्या सरकारने दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करून शीतकरण केंद्र सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाळीव डुकरांचा हैदोस वाढला
आरमाेरी : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने स्वच्छतेबाबत माेहीम हाती घेतली नाही.
कव्हरेजअभावी माेबाईलधारक त्रस्त
आलापल्ली : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली, आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. टाॅवर व भूमिगत केबल लाईनवर लाखाे रुपये खर्च करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय
आरमाेरी : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी.
वाहनतळ नसल्याने नागरिकांना त्रास
आरमाेरी : शहरात खासगी रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. नगर परिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहने उभी ठेवली जात असल्याने वाहतुकीची काेंडी हाेण्याचे प्रकार वाढत आहेत.
ग्राहकांची लूट थांबवावी
चामाेर्शी : लहान-मोठ्या विक्रेत्यांकडून सर्रासपणे ग्राहकांची लूट सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी ग्रामीण, तसेच शहरी भागात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. ड्युप्लीकेट बिल ग्राहकांच्या माथी मारले जात आहे.
मध संकलनातून राेजगार
अहेरी : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सेवायोजन कार्यालय कूचकामीच
गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र, ऑनलाईन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाहीत.
उपकेंद्रांना स्वतंत्र इमारतीची गरज
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे.