शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकाने बंद होताच गोंडपिपरीत अवैध दारू विक्रीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठताच मद्यपींमध्ये आनंदाची लाट पसरली. अशातच जुन्या परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरणासाठी जीवाचे रान केले. अखेर यात त्यांना यश आले. जिल्ह्यात सर्वत्र अधिकृत दारूविक्री दुकाने सुरू झाली. परमिट रूम असलेले बियर बार आणि बियर शॉपी सुद्धा सुरू झाल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेळेचे निर्बंध लावण्यात आल्याने दारू दुकानांची उघडण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी करण्यात आली.

ठळक मुद्देवैध -अवैध विक्रीची तू तू मैं मैं थांबेना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : कोरोनाच्या नियमांमुळे दारू दुकानांना सकाळी ७ ते ४ वाजताची मर्यादा आहे. या संधीचा फायदा काही अवैध दारूविक्रेते घेत आहे. दुपारी ४ वाजतानंतर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठताच मद्यपींमध्ये आनंदाची लाट पसरली. अशातच जुन्या परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरणासाठी जीवाचे रान केले. अखेर यात त्यांना यश आले. जिल्ह्यात सर्वत्र अधिकृत दारूविक्री दुकाने सुरू झाली. परमिट रूम असलेले बियर बार आणि बियर शॉपी सुद्धा सुरू झाल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेळेचे निर्बंध लावण्यात आल्याने दारू दुकानांची उघडण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी करण्यात आली. उपरोक्त वेळात प्रत्येक दारू दुकानात, बियर बार, बियर शॉपीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मात्र ४ वाजताच्या नंतर संपूर्ण दारू दुकाने बंद होताच  मद्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या मद्यपींचा चांगलाच हिरमोड होत आहे. दारू दुकाने बंद झाल्यानंतर काही मद्यपींना मद्याचा आस्वाद घेण्याकरिता धडपड करावी लागत आहे. महागड्या किमतीने मद्य विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. दुकाने बंद होण्यापूर्वीच शहरातील व इतर ठिकाणातील जुने अवैध दारू विक्रेते या संधीचा फायदा घेत आहे. दुकाने बंद होण्यापूर्वीच दारूची साठवणूक करून  ज्यादा दराने ती विक्री करीत आहे. यामुळे पुन्हा एकदा अवैध दारू विक्रीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. दारूबंदी काळात प्रचंड उलाढाल करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांनी आपल्या रोजीरोटी करिता हा नवा फंडा अमलात आणल्याचे बोलले जात आहे.  यामुळे दारूबंदी काळात अवैध दारू विक्री, चालू काळातही अवैध दारू विक्री सुरू असल्याने बंदी व चालू यात फरकच काय ...? असे काही सूज्ञ नागरिकांचे मत आहे. यापेक्षा दारू दुकानांची वेळ नियमित करून मद्यपींना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी