आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 09:04 PM2021-09-15T21:04:37+5:302021-09-15T21:04:58+5:30

Gadchiroli News शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली.

Son killed along with grandmother and granddaughter; An electric fence was erected over the fishing pond | आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण

आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. राजू रामकृष्ण बिस्वास (१८), वीरकुमार सुभाष मंडल (११) व कमला बिस्वास (६५) अशी मृतांची नावे आहेत. (Son killed along with grandmother and granddaughter; An electric fence was erected over the fishing pond)

आष्टी तालुक्यातील राममोहनपूर येथील शेतकरी रामकृष्ण बिस्वास यांनी आपल्या शेतात मासेमारीचा खड्डा तयार केला आहे. कोणी मासे चोरू नयेत यासाठी त्यांनी त्याभोवती वीजतारेचे कुंपण लावले आहे. मंगळवारी दुपारी राजू व वीरकुमार हे या ठिकाणी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला व ते जागीच गतप्राण झाले. संध्याकाळी वीरकुमारची आई व आजी त्यांना शोधायला श्ोतात गेल्या. तेथे हे दोघे जमिनीवर पडलेले पाहून आजीने त्यांना हलवण्यासाठी हात लावताच विजेच्या धक्क्याने आजीही गतप्राण झाली. कमला यांच्या मागे येत असलेल्या बसंती मंडल ही प्रसंगावधान राखत दूर उभी झाल्याने तिचा जीव वाचला.
मृतक राजूचे वडील रामकृष्ण यांना पोलिसांनी शेतात विजेच्या प्रवाह सोडल्याकरिता ताब्यात घेतले आहे.

Web Title: Son killed along with grandmother and granddaughter; An electric fence was erected over the fishing pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू