प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:13+5:302021-04-08T04:37:13+5:30
राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सरचिटणीस आशिष धात्रक, कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, उपाध्यक्ष अशिमकुमार बिश्वास, सुरेश निंबोरकर, अनिल ...

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या साेडवा
राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, सरचिटणीस आशिष धात्रक, कोषाध्यक्ष राजेश चिल्लमवार, उपाध्यक्ष अशिमकुमार बिश्वास, सुरेश निंबोरकर, अनिल मुलकलवार, अनिता मुलकलवार यांनी शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांची भेट घेऊन पुष्पगुच्छाने स्वागत केलेे. शिक्षणाधिकारी परसा व कक्ष अधिकारी रोहणकर तसेच कार्यालयातील संबंधित सहायकांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन दिले. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेलाच करावे, पदावनत मुख्याध्यापकांना मूळ पदावर पदस्थापना द्यावी, रिक्त पदे लवकर भरावी. हिंदी / मराठी सूटची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. पदवीधर शिक्षकांच्या १/३ विषय शिक्षकांना पदवीधरची वेतनश्रेणी द्यावी. जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ द्यावा, चटोपाध्याय व स्थायीचे नियमितचे प्रस्ताव निकाली काढावे, ऑफलाईन अनुदान संबंधित पंचायत समित्यांना पाठवावे. मयत डी. सी. पी. एस.धारक शिक्षकांच्या कुटुंबाला लाभ द्यावा, मुख्याध्यापकांना १ हजारपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही, ही अट रद्द करावी, यासह एकूण २१ प्रलंबित समस्यांचा समावेश निवेदनात हाेता. प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी परसा यांनी दिले.