आतापर्यंत ७३ हजार नागरिकांनी घेतली काेराेनाची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:14+5:302021-04-23T04:39:14+5:30
गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र ...

आतापर्यंत ७३ हजार नागरिकांनी घेतली काेराेनाची लस
गडचिराेली जिल्ह्यात प्राथमिक उपकेंद्र, आराेग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हास्तरावरील शासकीय रुग्णालय मिळून एकूण ६८ शासकीय लसीकरण केंद्र आहे, तर गडचिराेली शहरात दाेन खासगी रुग्णालयात लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत काेराेनाचे एकूण १६ हजार ९३६ रुग्ण झाले आहे. यापैकी १२ हजार ७७३ जण काेरेानामुक्त झाले आहे. आतापर्यंत एकूण ५९ हजार ७३७ जणांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला तर १३ हजार ७०५ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला आहे.
बाॅक्स
एकूण रुग्ण १६,९३६
काेराेनामुक्त १२,७७३
काेराेनाने मृत्यू २८०
आतपर्यंत किती जणांना दिली लस ७३,४४२
केवळ पहिला डाेस किती जणांनी घेतला ५९,७३७
दाेन्ही डाेस किती जणांनी घेतला १३,७०५
मृत्यूचा धाेका कमी
काेराेनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. लस घेतल्यानंतर बऱ्याच दिवसांनी संबंधित नागरिकाचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला तरी त्याचा मृत्यू हाेण्याची शक्यता फार कमी आहे. लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याने लस घेतलेल्या नागरिकांची राेगप्रतिकारक शक्ती बरीच वाढते. त्यामुळे लागण झाली तरी फारसा परिणाम हाेत नाही.
दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक बिनधास्त
काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाेबतच लस घेणे गरजेचे आहे. पहिला व दुसरा डाेस घेणे आवश्यक आहे. जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १३ हजार ७०५ नागरिकांनी काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतले. दाेन्ही डाेस घेतलेले नागरिक आता काेराेना संसर्गाबाबत काही प्रमाणात बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे.