शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

आतापर्यंत २३ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:06 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार १२२ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली असली तरी प्रत्यक्षात २२ हजार ४०२ शेतकºयांच्याच खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे.

ठळक मुद्दे५७.२५ कोटी खात्यात जमा : १ हजार ८१८ शेतकºयांकडे दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजार १२२ शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली असली तरी प्रत्यक्षात २२ हजार ४०२ शेतकºयांच्याच खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. यात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. मात्र राष्टÑीयकृत बँकांचे काम धिम्या गतीने सुरू आहे. दुसरीकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज थकबाकी असलेल्या शेतकºयांकडून कर्जवसुलीचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र असणाºया ५८ हजार ९४७ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमाफीची एकूण रक्कम १३१ कोटी ५२ लाख ८८ हजार रुपये आहे. त्यापैकी तूर्त २८ हजार १२२ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत. त्यांना ७६ कोटी २६ लाख ९२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र त्या नावांचीही पुन्हा पडताळणी सुरू आहे. त्यापैकी २६ हजार ७४६ शेतकºयांच्या नावांची पडताळणी झाली आहे. त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वळती करण्याचे काम सुरू आहे. ज्या २८ हजार १२२ शेतकºयांची नावे तूर्त ग्रीन लिस्टमध्ये आली आहेत त्यात २१ हजार ५५० कर्जदार शेतकरी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आहेत. राष्टÑीयकृत बँकांचे ५६५९ तर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अवघे ९१३ कर्जदार शेतकरी आहेत.जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकºयांची निवड करून प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिड लाखांवर कर्जाची थकबाकी असणाºया शेतकºयांच्या बाबतीत येणारी अडचण मोठी आहे. त्यांना आताच कर्जमाफीतील फरकाची रक्कम भरण्याची सोय करावी लागणार आहे. मात्र अनेकांना याची कल्पना नाही.नियमित परतफेड करणाऱ्या ११ हजार शेतकऱ्यांना लाभआजापर्यंत ज्या शेतकºयांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला त्यात ११ हजार ३८६ थकबाकीदार तर ११ हजार १६ शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे आहेत. त्यांना १६ कोटी ४२ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे.३०,८२५ शेतकरी वेटिंगवरजिल्ह्यात आतापर्यंत कर्जमाफीसाठी निवडलेल्या शेतकऱ्यांपैकी ग्रीन लिस्टमध्ये नाव दाखल झालेले शेतकरी अर्ध्यापेक्षा कमी आहेत. अजून ३० हजार ८२५ शेतकºयांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली नाहीत. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून त्या शेतकºयांच्या खात्यांची आणि इतर बाबींची तपासणी केल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र नावे ग्रिन लिस्टमध्ये टाकली जातील. त्यानंतर पुन्हा बँक स्तरावर त्यांच्या नावांची, खाते क्रमांकांची पडताळणी करून नंतरच प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी त्यांना पात्र ठरविले जाणार आहे.दीड लाखावरील रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभशासनाकडून दीड लाखापर्यंतच कर्जमाफी दिली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांची कर्ज थकबाकी दिड लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना दिड लाखाच्या वरची रक्कम स्वत: भरायची आहे. ती रक्कम भरल्याशिवाय त्यांना दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यात असे १८१८ थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यांची थकबाकीची एकूण रक्कम १८ कोटी ४८ लाख रुपये आहे.ग्रीन लिस्टमध्ये नावे आलेल्या दिड लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांबाबत प्रत्येक बँकेच्या शाखांना कळविले आहे. त्या शेतकºयांनी थकबाकीची रक्कम कोणत्या मुदतीत भरायची याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत. मात्र त्यांनी लवकरात लवकर दिड लाखांपेक्षा अधिकची रक्कम भरल्यास त्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल. सर्वच शेतकºयांकडे पैशाची सोय तातडीने होणे शक्य नसले तरी त्यांनी तसा प्रयत्न करावा.- सीमा पांडे,जिल्हा उपनिबंधक, गडचिरोली

टॅग्स :Farmerशेतकरी