आतापर्यंत १०५८ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:04+5:30

या नवीन रुग्णांमध्ये एक आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून १ जण, चामोर्शी येथून आलेला १, रामनगर येथील ४, सामान्य रूग्णालयातील ७ जण यामध्ये कनेरी येथील १, शिवनी येथील १, चणकाईनगर येथील रु ग्णालयात दाखल असलेला १ असे १६ जण, तसेच विसोरा (वडसा) येथील १ एसआरपीएफ धानोरा येथील शाळेतील १ स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील ४ तर कुरखेडा येथील १ जण मिळून ६६ नवीन बाधित मिळाले.

So far 1058 people have been infected with coronavirus | आतापर्यंत १०५८ जण कोरोनाबाधित

आतापर्यंत १०५८ जण कोरोनाबाधित

ठळक मुद्देनवीन ६६ जणांची भर : चामोर्शीतील ४३ तर गडचिरोलीत १६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/चामोर्शी : चामोर्शी नगरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाल्याने जिल्ह्यातील कोरोनारु ग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी पॉझीटिव्ह रु ग्णांचा आकडा प्रथमच १००० च्या पलीकडे गेला. दिवसभरात ६६ नवीन रु ग्णांची भर पडली असून त्यात सर्वाधिक ४३ जण चामोर्शी येथील आहेत.
चामोर्शीतील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील ४६९ जणांची शुक्रवारी रॅपिड टेस्ट केली असता त्यात ४३ जण कोरोनाबाधित आढळून आले. शिवाय गडचिरोली येथे १६ नवीन कोरोनाबाधित आढळले.
या नवीन रुग्णांमध्ये एक आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून १ जण, चामोर्शी येथून आलेला १, रामनगर येथील ४, सामान्य रूग्णालयातील ७ जण यामध्ये कनेरी येथील १, शिवनी येथील १, चणकाईनगर येथील रु ग्णालयात दाखल असलेला १ असे १६ जण, तसेच विसोरा (वडसा) येथील १ एसआरपीएफ धानोरा येथील शाळेतील १ स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील ४ तर कुरखेडा येथील १ जण मिळून ६६ नवीन बाधित मिळाले.
आता जिल्हयातील क्रियाशील कोरोना रुग्ण २०६ झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ८५१ झाली असून जिल्ह्यात एकही रुग्ण दगावलेला नाही.

कॅन्सरग्रस्तासह १२ जण कोरोनामुक्त
दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी १२ जण कोरोनामुक्त झाले. त्यात गडचिरोली येथील १ स्थानिक नागरिक, ३ पोलीस कर्मचारी आणि अहेरीचे 4 जणांचा समावेश आहे. अहेरीतील कोरोनामुक्तांमध्ये एक जण कर्करोगाने ग्रस्त आहे. त्याने कोरोनावर मात केल्याने अनेक रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय भामरागड येथील २ पोलीस तर चामोर्शीमधील २ स्थानिक नागरिकही शुक्रवारी कोरोनामुक्त झाले आहेत.

चामोर्शीत ४६९ जणांची तपासणी
चामोर्शी शहरातील नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक शुक्रवारी दाखल झाले. या पथकाने ४६९ जणांची तपासणी केली असता, ४३ जण कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झिाले आहे. शुक्रवारी जे रूग्ण कोरोनाग्रस्त आढळले त्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. कोरोना तपासणीसाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे. रूग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास संपूर्ण चामोर्शी शहर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करावा लागेल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली.

Web Title: So far 1058 people have been infected with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.