ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संथगतीने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST2021-05-07T04:38:51+5:302021-05-07T04:38:51+5:30

ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुकास्तरावर ऑक्सिजनयुक्त बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे ...

Slow operation of oxygen production plant | ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संथगतीने वाटचाल

ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संथगतीने वाटचाल

ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुकास्तरावर ऑक्सिजनयुक्त बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प तातडीने सुरू करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्लांटची उभारणी करण्यास तातडीने मंजुरी दिली. यासोबतच प्लांट उभारणीसाठी निधीही मंजूर केला. तरीही जिल्हा सामान्य रुग्णालय वगळता जिल्ह्यात कुठेही या प्लांटची उभारणी अद्याप झाली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याशिवाय वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तालुकास्तरावर काही रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोना बळींची संख्याही बरीच वाढली आहे. तरीही ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना विलंब लागण्यामागे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Slow operation of oxygen production plant