लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी बंदचे आवाहन केले आहे. या आवाहनाचा ग्यारापत्ती, गट्टा (जांभिया), हेडरी, कोठी येथील गावकऱ्यांनी विरोध दर्शविला असून नक्षलविरोधी बॅनर लावून नक्षल्यांविरोधात नारेबाजी केली.२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी दुर्गम भागात ठिकठिकाणी पत्रके टाकून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नक्षल्यांच्या भीतीमुळे मागील वर्षीपर्यंत नागरिक नक्षल सप्ताह पाळत होते. मात्र नक्षलवाद्यांची विकासविरोधी निती स्थानिक नागरिकांच्या लक्षात यायला लागल्याने स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. नक्षल सप्ताहादरम्यान नक्षलवादी खून, जाळपोळ करून स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आदिवासी जनतेने नक्षलवाद्यांना कोणत्या कारणास्तव समर्थन द्यायचे, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. ‘आम्ही नक्षल सप्ताह पाळणार नाही’, असा निर्धार केला.जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या नागरिकांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
नक्षल सप्ताहविरोधात नारेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांनी दुर्गम भागात ठिकठिकाणी पत्रके टाकून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नक्षल्यांच्या भीतीमुळे मागील वर्षीपर्यंत नागरिक नक्षल सप्ताह पाळत होते. मात्र नक्षलवाद्यांची विकासविरोधी निती स्थानिक नागरिकांच्या लक्षात यायला लागल्याने स्थानिक नागरिकांनी नक्षलवाद्यांचा विरोध करण्यास सुरूवात केली आहे.
नक्षल सप्ताहविरोधात नारेबाजी
ठळक मुद्दे२८ पासून सप्ताह : गावकऱ्यांनी झुगारले नक्षलवाद्यांचे आवाहन