सहा महिला मजुरांच्या नावे काढली प्रतीदिवस चार हजारांवर मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:52+5:30

आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती करण्यात आली. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत १ लाख ९९ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १५ महिलांनी १५ ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत सहा दिवस रोपांसाठी पिशव्या भरण्याचे काम केल्याचे दाखविण्यात आले.

Six thousand laborers were paid in the name of four thousand wages per day | सहा महिला मजुरांच्या नावे काढली प्रतीदिवस चार हजारांवर मजुरी

सहा महिला मजुरांच्या नावे काढली प्रतीदिवस चार हजारांवर मजुरी

ठळक मुद्देजोगीसाखरा रोपवाटिकेतील कामात घोळ । एका दिवशी चार हजार १७५ पिशव्या भरल्याचे दाखविले

लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत २०१९ मध्ये रोप निर्मितीचे काम करण्यात आले. परंतु या कामाची मजुरी काढताना घोळ झाला. २ लाख २ हजार ७३६ रुपये मजुरी १५ महिलांच्या बँक खात्यात अदा करण्यात आली. यापैकी सहा महिलांच्या नावे प्रतीदिवस चार हजार २४६ रुपये मजुरी दाखविण्यात आली. यात प्रतीदिवस सहा महिलांनी ४ हजार १७५ पिशव्या भरल्याचे काम दाखविल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे.
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती करण्यात आली. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत १ लाख ९९ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १५ महिलांनी १५ ते २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत सहा दिवस रोपांसाठी पिशव्या भरण्याचे काम केल्याचे दाखविण्यात आले. योजनेअंतर्गत रेती, माती, सुपीक खत मिश्रीत १ लाख ९९ हजार पिशव्या भरण्याकरिता २ लाख २ हजार ७३६ रुपयांचा धनादेश क्रमांक १०००३२ हा १५ मार्च २०१९ रोजी १५ महिलांच्या बँक खात्यात मजुरीच्या रूपात वळता करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून येथील रोपवाटिकेत विविध कामे केली जात आहेत. परंतु या कामांमुळे आपल्या मर्जीतील स्थानिक मजुरांना कामावर घेतले जाते. तसेच अनेक वनमजुरांच्या नातेवाईकांच्या नावे सुद्धा मजुरी बँक खात्यात जमा केली जात असल्याची शंका उपस्थित होत आहे. मात्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. प्रत्येक महिला मजुराने एका दिवशी ४ हजार १७५ पिशव्या भरल्याचे दाखवून घोळ केला आहे. अनेक बोगस मजुरांच्या खात्यात मजुरी वळती करून तसेच नियमबाह्य पद्धतीने काम केले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मजुरांनी केली आहे.

जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये राज्य कॅम्पा योजनेतून रोप निर्मितीचे काम करण्यात आले. यात एका महिला मजुराकडून मोठ्या पिशव्या ११३ व लहान पिशव्या ३०० पेक्षा अधिक भरायच्या असतात. सदर काम अंदाजपत्रकीय तरतुदीतील मनुष्य दिवसानुसार करायचे असते. त्याप्रमाणे ते करण्यात आले.
- सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी, आरमोरी

१५ मजुरांच्या बँक खात्यात असे केले पैसे जमा
जोगीसाखरा येथील सहा महिलांच्या नावे प्रतीदिवस प्रतीमहिला मजुरांनी ४ हजार १७५ पिशव्या भरल्याचे काम दाखवून प्रतीदिवस प्रतीमहिला ४ हजार २४६ रुपये मजुरी देऊन त्यांच्या नावे १ लाख ५२ हजार ८८० रुपये जमा केले. त्यानंतर सातव्या महिलेच्या बँक खात्यात ५ हजार ४८६, आठव्या महिलेस ५ हजार ४९८, नवव्या महिलेस ९ हजार ७१, दहाव्या महिलेस ३ हजार २८५, अकराव्या महिलेस ३ हजार १५०, बाराव्या महिलेस १० हजार ९८०, तेराव्या महिलेस ८ हजार ६२२, चौदाव्या महिलेस सहा दिवसांचे शासकीय मजुरीप्रमाणे २ हजार ३८ तर १५ व्या महिलेस पाच दिवसांची १ हजार ६९८ रुपये मजुरी असे एकूण २ लाख २ हजार ७३६ रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले.

Web Title: Six thousand laborers were paid in the name of four thousand wages per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल