वाहन उलटून सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:52 IST2018-04-22T00:52:40+5:302018-04-22T00:52:40+5:30
तालुक्यातील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या लभानतांडाजवळ गुरुबक्षाणी कंपनीच्या कामावर जात असलेले चारचाकी वाहन उलटल्याने चालक व मदतनीस यांच्यासह सहा मजूर जखमी झाले.

वाहन उलटून सहा जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर असलेल्या लभानतांडाजवळ गुरुबक्षाणी कंपनीच्या कामावर जात असलेले चारचाकी वाहन उलटल्याने चालक व मदतनीस यांच्यासह सहा मजूर जखमी झाले. ही घटना शनिवारी घडली. त्यात तीन मजूर गंभीर असून इतर तिघेजण किरकोळ जखमी आहेत.
शनिवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कामावर मिक्सर भरून नेणारे वाहन उलटले यामध्ये सुनंदा शंकर वाटगुरे (३५) रा. बोरी, वेमाजी पांडुरंग निकुरे (४५) रा. सोमनपल्ली, गोदाबाई महादेव गुरनुले (६०) रा. बोरी, मायाबाई गजानन मोहुर्ले (५०) रा. बोरी, माधुरी जितेंद्र आडे (३१) रा. बोरी, संजय गोवर्धन वाकडे (३५) रा. देलोडा हे जखमी झाले असून सुनंदा वाटगुरे व इतर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तत्काळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यानंतर सहा जणांना गडचिरोलीला हलविण्यात आले. जखमींच्या उपचाराचा खर्च गुरुबक्षाणी कंपनी करीत आहे.