Six men arrested for ransom | खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक
खंडणी मागणाऱ्या सहा जणांना अटक

ठळक मुद्दे२५ पर्यंत कोठडी : कारवाफातील आरोपी, पोलीस असल्याची केली बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पोलीस असल्याची बतावणी देऊन वाहनाने जनावरे घेऊन जाणाºया वाहनचालकांना पैसे मागणाऱ्या सहा जणांना कारवाफा पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रमेश आनंदराव मडावी (४४), विक्की सुरेश मडावी (२६), सौरव रमेश मडावी (१९), संजय यादव वडणलवार (४७), राहुल कान्होजी मेश्राम (२१) विक्रांत ऋषी मडावी (२३) सर्व रा.कारवाफा अशी आरोपींची नावे आहे. फिर्यादी व त्यांचे साथीदार जनावरे घेऊन दिंडवीवरून गडचिरोकडे जात होते. साखेराच्या अलिकडे आरोपींनी वाहन अडवून त्यांना आपण पोलीस असल्याची बतावणी दिली. जबरदस्तीने त्यांच्याकडून मोबाईल, रक्कम व पॉकेट काढून बेदम मारहाण केली. तसेच एक लाख रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार कारवाफा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. या सर्वांना न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींपैकी रमेश मडावी हे एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनात धानोराचे प्रभारी अधिकारी अजिनाथ कोठाडे करीत आहेत.


Web Title: Six men arrested for ransom
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.