शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणात सहा अटकेत

By admin | Updated: July 19, 2014 23:54 IST

नागपूरलगत असलेल्या कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून बनावट दस्तऐवजांच्या आधारे बेरोजगारांची लाखो रूपयांनी फसवणूक करणाऱ्या

देसाईगंज : नागपूरलगत असलेल्या कोराडी महाऔष्णिक वीज केंद्रात नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून बनावट दस्तऐवजांच्या आधारे बेरोजगारांची लाखो रूपयांनी फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही मोठे आरोपी अटक होण्याची शक्यता असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनोज दिनेवार, चंद्रशेखर मोरकर, सुहास बांबोडे, विनोद तागडे, आशिष घडसापुरे, गजानन भारूरकर सर्व रा. घडेगाव ता. सावनेर जि. नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी हे देसाईगंज येथील कस्तुरबा वार्डातील एका ओळखीच्या नागरिकाच्या घरी येऊन कोराडी औष्णिक वीज केंद्राचे बनावट ओळखपत्र व जॉयनिंग आॅर्डर बनविले. सदर बनावट दस्तऐवज देऊन अमोल भैसारे, पुलाला दाबनकर, रितेश धाकडे, सुमित्रा चंदनखेडे, ममता मोरकर, प्रवीण खोब्रागडे, प्रज्ञा खोब्रागडे यांच्याकडून प्रत्येकी दोन ते साडेतीन लाख रूपये घेतले. एकूण १८ लाख ३० हजार रूपये घेऊन ते पसार झाले. काही दिवस लोटूनही नोकरीचा पत्ता नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अमोल भैसारे या युवकाने देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार केली. तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविचे कलम ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगाने चक्रे फिरवीत सहाही आरोपींना नागपूर येथे अटक केली आहे. या सर्व आरोपींना देसाईगंज येथील प्रथम सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्याच्या घरी हा सर्व व्यवहार झाला, त्याही नागरिकावर संशय व्यक्त केला जात आहे. त्याचाही या गुन्ह्यात समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याही नागरिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)