इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:11+5:302021-07-14T04:42:11+5:30
कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले. यातच महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले. भाजप सरकारच्या विराेधी धाेरणामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था, ...

इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान
कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले. यातच महागाईने सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण झाले. भाजप सरकारच्या विराेधी धाेरणामुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था, सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या महागाईचा भस्मासूर आदी समस्यांची जाणीव सर्वांना व्हावी यासाठी निषेध म्हणून स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले. नारेबाजी करून केंद्र सरकारचा निषेध नाेंदविण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे निरीक्षक केतन रेवतकर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तेजस मडावी, शालिक पत्रे, नगरसेविका निर्मला किरमे, दिलीप घोडाम, कमलेश खानदेशकर, नीलेश अंबादे, मयूर वनमाळी, सौरभ जक्कनवार, सूरज भोयर, श्रीकांत वैद्य, मंगेश पाटील, मंगेश कुथे, निखिल दुमाने, भूपेश वाकडे, निशांत वनमाळी, अजय नारनवरे, खेमचंद्र चाटाळे, महेश ठाकरे, दीपक ठाकरे, अनिल किरमे, भूषण काळबांधे, शुभम दुगा, रूपेश जवंजाळकर, मोहन डिडरे, दिनेश मडावी व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
110721\3847img-20210711-wa0041.jpg
आरमोरी येथील पेट्रोल पंपावर स्वाक्षरी अभियान सुरू करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी.....