आरमोरीतील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:16+5:302021-02-18T05:08:16+5:30
कासवी, किटाळी, बोरी चक, वासाळा ग्रामपंचायतचे सरपंच पद, डोंगरसावंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद, तसेच डोंगरगावचे उपसरपंच पद ...

आरमोरीतील अनेक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा
कासवी, किटाळी, बोरी चक, वासाळा ग्रामपंचायतचे सरपंच पद, डोंगरसावंगी ग्रामपंचायतचे उपसरपंच पद, तसेच डोंगरगावचे उपसरपंच पद शिवसेनेने काबीज केले असून, विविध ग्रामपंचायतवर शिवसेनेने भगवा फडकवला असल्याची माहिती शिवसेनेच्या चंदेल गटाने दिली असून, तसा दावाही त्यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र चंदेल व माजी युवासेना प्रमुख चंदू बेहरे, नगर परिषद सभापती सागर मने व भूषण सातव यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील वरील ग्रामपंचायतवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे. यावेळी छाया कुंभारे, चंद्रशेखर मने, अविनाश गेडाम, शंकर सातव, नगरसेवक माणिक भोयर ,कवळू सहारे, लहाणू पिल्लारे, लोमेश हरडे, विलास तुंबडे, बाबूराव राऊत, पंढरी मत्ते, रतीराम गुरनुले, सुरेश धोंगडे, शैलेश चिटमलवार, टीकाराम खेवले, लोमेश सेलोटे, अक्षय चाचरकर, जयंत दहीकर व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला आहे.