कुरखेडा रुग्णालयाला शिवसेनेने दिले ऑक्सिजनचे २५ सिलिंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:35 IST2021-05-01T04:35:00+5:302021-05-01T04:35:00+5:30

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात जवळपास ८० काेराेनाबाधित रुग्ण भरती आहेत. ऑक्सिजन लेवल कमी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते. काेराेनाबाधितांवर ...

Shiv Sena donates 25 cylinders of oxygen to Kurkheda Hospital | कुरखेडा रुग्णालयाला शिवसेनेने दिले ऑक्सिजनचे २५ सिलिंडर

कुरखेडा रुग्णालयाला शिवसेनेने दिले ऑक्सिजनचे २५ सिलिंडर

कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात जवळपास ८० काेराेनाबाधित रुग्ण भरती आहेत. ऑक्सिजन लेवल कमी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते. काेराेनाबाधितांवर उपचारासोबत त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास प्रसंगी रुग्ण मृत्यूमुखी पडू शकतो, हीच बाब लक्षात घेऊन माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात व किरण पांडव यांच्या सहकार्याने कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजनचे १०० सिलिंडर देण्याचे ठरविले असून २५ सिलिंडरची पहिली खेप ३० एप्रिल राेजी रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनच्या सिलिंडरचा पुरवठा करण्याचा चंदेल यांचा मानस आहे. ऑक्सिजन सिलिंडरची पहिली खेप सुपूर्द करताना शिवसेनेच माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष महेंद्रकुमार मोहबंसी, माजी तालुकाप्रमुख आशीष काळे, माजी शहरप्रमुख संजय देशमुख, माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख, डॉ. अनिल उईके उपस्थित हाेते.

Web Title: Shiv Sena donates 25 cylinders of oxygen to Kurkheda Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.