चांभार्डा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:08 IST2021-02-18T05:08:44+5:302021-02-18T05:08:44+5:30

गडचिराेली : स्थानिक पंचायत समितींतर्गत चांभार्डा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशाेर पाेद्दार यांच्या अथक परिश्रमाने शिवसेना उपजिल्हा प्रमुख ...

Shiv Sena dominates Chambharda Gram Panchayat | चांभार्डा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व

चांभार्डा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे वर्चस्व

गडचिराेली : स्थानिक पंचायत समितींतर्गत चांभार्डा ग्रामपंचायतवर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशाेर पाेद्दार यांच्या अथक परिश्रमाने शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात बुधवारी शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यात आले. बुधवारी येथे झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने यश मिळविले आहे. या निवडणुकीत उपसरपंचपदी सूरज उईके तर उपसरपंचपदी संदीप अलबनकर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी तालुका प्रमुख गजानन नैताम, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, अमोल मेश्राम, संजय बोबाटे, स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, उमाजी लाजुलकार, पुरुषोत्तम चनेकार, विनोद मुत्तमवार, ईश्वर लाजुलकार, यादव कोलते, भूषण देशमुख, सुरेश कोलते, बालाजी फुकटे, महादेव हजारे, तसेच चांभार्डा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य सूरज उईके, संदीप अलबनकर, अश्विनी चनेकार, अर्चना लडके आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena dominates Chambharda Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.