शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

लाखोंनी गंडविणाऱ्या शिफाला अखेर उत्तरप्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:21 AM

कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली.

ठळक मुद्देदेसाईगंज पोलिसांची कारवाई : कमी किमतीत वस्तू देण्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंजवासीयांना लाखो रुपयांनी गंडविणाऱ्या शिफा उर्फ शबाना व तिचा पती राज मोहम्मद चौधरी यांना देसाईगंज पोलिसांनी उत्तरप्रदेशातील बहेरमपूर जिल्ह्यातून अटक केली. त्यांना मंगळवारी रात्री उशिरापर्यंत देसाईगंजमध्ये आणले जाणार आहे. शिफाच्या अटकेमुळे या प्रकरणात पडद्यामागची भूमिका निभावणारे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शिफा हिने देसाईगंज शहरातील राजेंद्र वॉर्डात ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला होता. काही कालावधीनंतर शिवणक्लास व ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. त्यानंतर एक हजार रुपयात सायकल, दोन हजार रुयात शिवणयंत्र, १० हजार रुपयात एक तोळे सोने, १५ हजार रुपयात घरकूल मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सुरूवातीच्या गुंतवणूकदारांना वस्तू देऊन त्यांचा विश्वासही संपादन केला. त्यानंतर अनेक नागरिक तिच्या भूलथापांना बळी पडू लागले. त्यानंतर मोठी योजना सुरू केली. त्यामध्ये २० हजार रुपयात दुचाकी, अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर, लक्झरी बसेस मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिने मोठमोठ्या रकमा उकळल्या. मात्र त्यानंतर साहित्य देण्यास टाळटाळ होऊ लागली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देसाईगंज येथील बचत गटाच्या महिला, सोना-चांदीचे व्यापारी, सायकल विक्रेते, फर्निचर विक्रेत्यांनी शिफाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच शिफाने पळ काढला. शिफा भाड्याने राहात असलेल्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले. या प्रकरणात एका मोठ्या व्यक्तीने पडद्यामागील भूमिका केल्याचे बोलले जाते. शिफाने जमविलेले पैसे त्या व्यक्तीकडेच दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच त्याचे नाव समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.असे घेतले ताब्यातदेसाईगंजचे पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे यांनी शिताफीने शिफा व तिच्या पतीचा शोध घेतला. ती उत्तरप्रदेशातल्या बहेरमपूर जिल्ह्यातील ताकियावा येथे पतीसह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर दि.१९ ला देसाईगंज ठाण्याचे उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांच्या नेतृत्वात चार जणांचे पथक तिकडे निघाले. फोटोच्या आधारे त्यांनी शिफा व तिच्या पतीला गाठले. दि.२३ च्या रात्री दोघांनाही ताब्यात घेतले. दि.२४ ला तेथील न्यायालयात हजर करून प्रवासी हस्तांतरण परवानगी घेतली. त्यानंतर दोन्ही आरोपींना घेऊन ठाण्याचे पथक देसाईगंजकडे निघाले. मंगळवारी रात्री पोहोचल्यानंतर बुधवारी शिफा व तिच्या पतीला देसाईगंजच्या न्यायालयात हजर करून पीसीआर मागितला जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस