विश्रामगृहाअभावी राजकीय पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवनाचा आसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:33+5:302021-04-05T04:32:33+5:30

चामोर्शी तालुक्यात कुनघाडा(रै) हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने बरेच मोठे आहे १५ सदस्य संख्या असलेल्या कुनघाडा(रै) ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास १० ...

Shelter of Gram Panchayat Bhavan for political office bearers due to lack of rest house | विश्रामगृहाअभावी राजकीय पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवनाचा आसरा

विश्रामगृहाअभावी राजकीय पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवनाचा आसरा

चामोर्शी तालुक्यात कुनघाडा(रै) हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने बरेच मोठे आहे १५ सदस्य संख्या असलेल्या कुनघाडा(रै) ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास १० हजार आहे. कुनघाडा हे गाव जिल्हा परिषद क्षेत्राचे केंद्रबिंदू असून या जि.प.क्षेत्रा अंतर्गत कुनघाडा व गिलगाव, तळोधी व नवेगाव असे दोन पंचायत समितीचे गण आहेत. सदर जि.प. क्षेत्रात २५ गांवाचा समावेश असून क्षेत्राची लोकसंख्या जवळपास २५ ते २६ हजार एवढी आहे. कुनघाडा जि.प.क्षेत्रा अंतर्गत कुनघाडा(रै) तळोधी, नवेगाव, गिलगाव, माल्लेरमाल, नवरगाव, भाडभिडी अशा एकूण ७ ग्रामपंचायतचा समावेश आहे परिसराचे मुख्य केंद्र बिंदू कुनघाडा(रै) असल्यामुळे बाहेरुन येणारे राजकीय पदाधिकारी, विविध विभागाचे

शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना कुनघाडा(रै) येथे थांबून विविध सभा घ्यावा लागतात. तसेच त्यांच्या विसाव्यासाठी विश्रामगृहाची आवश्यकता आहे. मात्र विश्रामगृह नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत भवन किंवा पक्षाचे समर्थक पक्षाचे सदस्य यांच्या घरी थांबून सभा घ्याव्या लागत आहेत, ग्रामपंचायत भवन किंवा सदस्यांच्या घरी पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे किंवा जागेची अडचण भासत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणीशी तोंड द्यावे लागते. क्षेत्राचे खासदार आमदार मंत्री किंवा मंत्र्यांचे प्रतिनिधी तसेच शासकीय पदाधिकारी क्षेत्राची लोकसंख्या बघून तेथील समस्या जाणून घेण्यासाठी वर्षातून एक-दोन वेळा भेटी देत असतात. भेटीदरम्यान नेमके कुठे थांबावे, असा प्रश्न ही पडत असतो आजपर्यंतच्या कालखंडात कुनघाडा(रै) हे गाव राजकीय पदाधिकाऱ्यांचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातून जिल्हा परिषद अध्यक्षापासून सभापती ते पंचायत समिती सभापतीचेपद भुषविले आहेत. मात्र पदाधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे क्षेत्राचा विकास खुंटला आहे. क्षेत्राची समस्या लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींना वारंवार पाचारण करून त्याच्या सभा घेऊन त्याच्याशी हितगुज व चर्चा करण्यासाठी विश्रामगृहाची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Shelter of Gram Panchayat Bhavan for political office bearers due to lack of rest house