शौर्यदिनी सीआरपीएफ जवानांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:52 IST2018-04-09T22:52:37+5:302018-04-09T22:52:37+5:30
केंद्रीय रिझर्व पोलीस दल ११३ बटालियनचा शौर्यदिन ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सीआरपीएफ जवानांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

शौर्यदिनी सीआरपीएफ जवानांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : केंद्रीय रिझर्व पोलीस दल ११३ बटालियनचा शौर्यदिन ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्त सीआरपीएफ जवानांना आंतरिक सुरक्षा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला कमांडंट एन. शिवशंकरा, द्वितीय कमान अधिकारी के.डी. जोशी, जे.पी. सॅम्युअल आदी उपस्थित होते. ९ एप्रिल १९६५ रोजी गुजरात राज्यातील सरदार पोस्ट कच्छ येथे पाकिस्तानी सैनिक व सीआरपीएफ जवान यांच्यामध्ये लढाई झाली. यामध्ये पाकिस्तानी सैनिकांना पिटाळून लावले. मात्र दुदैंवाने या लढाईदरम्यान सीआरपीएफच्या जवानांना वीर मरण प्राप्त झाले. हा दिवस सीआरपीएफच्या वतीने शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून धानोरा येथील ११३ सीआरपीएफ बटालियनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सीआरपीएफ जवानांना आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले. यावेळी कमांडंट एन. शिवशंकरा यांनी मार्गदर्शन केले.