शार्टसर्किटने कापसाचा ट्रक जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:45 IST2019-05-31T23:44:45+5:302019-05-31T23:45:14+5:30

वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली. कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता.

The sharksarkit burned the cotton truck | शार्टसर्किटने कापसाचा ट्रक जळाला

शार्टसर्किटने कापसाचा ट्रक जळाला

ठळक मुद्देदेसाईगंजातील घटना : शहरातून वाहतुकीस प्रतिबंध घाला

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : वीज खांबाला ट्रकचा स्पर्श झाल्याने शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याने कापसाने भरलेला ट्रक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी ४ वाजताच्या सुमारास देसाईगंज येथे घडली.
कापसाने भरलेला ट्रक देसाईगंज शहरातील कमलानगर वार्डातून ब्रह्मपुरीकडे जात होता. वार्डातील मार्ग अरूंद आहे. तसेच वीज ताराही पसरल्या आहेत. कापसाने भरलेला ट्रक उंच तसेच रूंद राहतो. त्यामुळे ट्रकचा वीज तारांना स्पर्श होऊन शॉर्टसर्कीट झाले. यामध्ये ट्रकला आग लागून ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. काही मिनिटाच्या आतच आगीचे डोंब निघण्यास सुरूवात झाली. या वार्डातून अवजड वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ब्रह्मपुरीकडे जाण्यासाठी देसाईगंज शहराच्या बायपाय मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र अनेक चालकांना हा मार्ग लक्षात येत नाही. तसेच या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालक गजबजलेल्या देसाईगंज शहरातून वाहने टाकतात. परिणामी अशा घटनांना सामोर जावे लागते.

Web Title: The sharksarkit burned the cotton truck

टॅग्स :fireआग