शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान

By admin | Updated: June 27, 2016 01:39 IST

देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित

गडचिरोली : देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून समाजातील दीन-दुबळे, गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराज यांनी केले. सामाजिक समता प्रस्थापित करण्यात शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रविवारी आयोजित मुख्य सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुरेश डोंगे, क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकाश अर्जुनवार आदी उपस्थित होते. यावेळी खासदार नेते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलित उपेक्षीत समाजातील जनतेला आरक्षण लागू केले. विद्यमान शासन या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवित आहे. आपला देश सर्वजाती धर्माच्या लोकांनी बनलेला आहे. समाजातील विषमता दूर होऊन समाज एकसंघ बनण्यासाठी तळागाळातील माणसाला विकासात समान संधी दिली पाहिजे, असे यावेळी म्हणाले. आमदार डॉ. देवराव होळी यांनी छत्रपती शाहू महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीतही समाजातील विषमता दूर करण्याचे महान कार्य केले. लोकशाहीत शासन व प्रशासनातील यंत्रणेमध्ये समन्वय ठेवून सामाजिक दायित्वाचे भान राखून काम करण्याची गरज आहे, असे सांगितले. या कार्यक्रमापूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८ वाजता शहरातील इंदिरा गांधी चौकात रॅली काढण्यात आली. या रॅलीत वसंत विद्यालय, शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून लोकांना सामाजिक समतेचा संदेश दिला. प्रास्ताविक समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुरेश पेंदाम यांनी केले.