एका पदाधिकाऱ्यासह सात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 15, 2015 22:51 IST2015-01-15T22:51:20+5:302015-01-15T22:51:20+5:30

गैर कायद्याची मंडळी जमवून इतर विद्यार्थ्यांना भडकावून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी

Seven students, including an official, have been booked for the crime | एका पदाधिकाऱ्यासह सात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

एका पदाधिकाऱ्यासह सात विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : गैर कायद्याची मंडळी जमवून इतर विद्यार्थ्यांना भडकावून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांच्या मार्फत बुधवारी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आदिवासी विद्यार्थी संघाच्या एका पदाधिकाऱ्यासह वसतिगृहाच्या सात विद्यार्थ्यांवर बुधवारी गुन्हा दाखल केला. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांनी आठही आरोपीविरोधात भादंविचे कलम ३५३, १४३, १४७, १४९, ४२७, ३४२, ५०४ व सहकलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी दौलत धुर्वे, आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थी प्रकाश चमरू मट्टामी, विनोद मासू तेलामी, प्रविण मंसाराम हलामी, अनिल तुलाराम केरामी, मोरेश्वर परशुराम पदा, मुकेश रामदास नरोटे, राकेश मारोती आत्राम, राजेंद्र कालिराम वटी आदींचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Seven students, including an official, have been booked for the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.