आष्टी येथे ५० बेडचे काेविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:31 IST2021-05-03T04:31:24+5:302021-05-03T04:31:24+5:30
आष्टी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिसरातील गावांत सध्या तापाची साथ असून, त्यांची कोरोना टेस्ट ...

आष्टी येथे ५० बेडचे काेविड सेंटर उभारा
आष्टी परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परिसरातील गावांत सध्या तापाची साथ असून, त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. बरेच रुग्ण आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. येथील कोरोनाबाधित रुग्णांना चामोर्शी व गडचिरोली येथील काेविड केंद्रात पाठविले जाते. अशातच चामोर्शी येथे असलेल्या केंद्रात वाढणारी गर्दी व अपुऱ्या बेडअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आष्टी व परिसरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे ५० बेडचे काेविड केंद्र उभारल्यास नागरिकांना वेळेत उपचार मिळेल. आरोग्य यंत्रणेवरचा भार हलका होईल. त्यामुळे आष्टी येथे काेराेना सेंटर उभारावे, अशी मागणी राकेश बेलसरे यांनी केली आहे.