त्रुटी निराकरणासाठी सेवापुस्तक पडताळणी
By Admin | Updated: January 18, 2015 22:44 IST2015-01-18T22:44:02+5:302015-01-18T22:44:02+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक

त्रुटी निराकरणासाठी सेवापुस्तक पडताळणी
आरमोरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्राथ. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आले होती. यावेळी सेवा पुस्तकातील त्रुट्या दूर करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याचे मुख्य लेखा अधिकारी दामोधर राऊत यांनी सूचविले होते. त्या अनुषंगाने प्रथम आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागामध्ये शिक्षकांचे सेवा पुस्तकांची पडताळणी १६ ते १७ जानेवारीदरम्यान करण्यात आली.
पडताळणीदरम्यान मदनकर, निकम व दुनेदार यांनी अनेक त्रूट्यांचे निराकरण केले. यावेळी मुख्य लेखा अधिकारी दामोदर राऊत, संवर्ग अधिकारी शालिक धनगर, लेखाधिकारी शेंडे, साहयक लेखाधिकारी बोक्कावार, जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी भेट देऊन तेथील पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
आरमोरी येथील पडताळणीच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी नरोटे, जयंत राऊत, सुनील चरडुके, संजय बिडवाइकर, गुलाब मने, मेघराज बुराडे, श्रीरामवार, उइनवार, जीवन शिवणकर, गुणवंत हेडाऊ, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)