आष्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गृह विलगीकरणामुळे कुटुंबातील इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. परंतु विलगीकरणाची सोय, तालुक्याचे ठिकाण असलेल्या चामोर्शी (मार्कंडा देव) येथे असल्याने रुग्णांना अडचण येत होती. ती लक्षात घेऊन आष्टी ग्रामपंचायतीने विलगीकरणाची सोय केली. या रुग्णांची रोज डाॅक्टरांमार्फत तपासणी होत आहे. रुग्णाची प्रकृती बिघडल्यास त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. अशा प्रकारे विलगीकरणाची सोय करणारी गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीने विलगीकरणाची व्यवस्था केल्यास तालुका व जिल्हा स्तरांतील विलगीकरण कक्षावरील भार हलका होऊ शकतो. रुग्णांना येणाऱ्या दैनंदिन अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात.
आष्टी ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राला स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी, चामोर्शी पंचायत समितीचे बीडीओ, आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुमारसिंग राठोड, पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी भेट देऊन कौतुक केले. जिल्ह्यतील इतर ग्रामपंचायतींनी आष्टी ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबीताई बुरांडे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राकेश बेलसरे, कपिल पाल, संतोष बारापात्रे, छोटू दुर्गे, प्रकाश बोबाटे, ग्रामसेवक अनिल पंधरे उपस्थित होते.
===Photopath===
060521\06gad_1_06052021_30.jpg
===Caption===
आष्टी ग्रामपंचयातीने तयार केलेेेले विलगीकरण कक्ष