शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
2
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
3
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
4
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
5
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
6
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
7
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
8
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
9
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
10
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
11
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
12
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
14
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
15
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
16
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
17
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
18
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
19
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
20
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत ‘कोरोना’च्या परिस्थितीवर पोलिसांचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:48 PM

गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कोरोना विषाणू साथीच्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधक घालण्यासाठी व त्या संदर्भातील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यातून सामान्य नागरिकांना मदत व सहकार्य केले जाणार आहे.

ठळक मुद्देसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठेवणार समन्वय२४ तास देणार सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कारोना विषाणूमुळे (कोव्हिड-१९) उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचे निवारण आणि नियंत्रणासाठी सर्वत्र संचारबंदी लागू आहे. याअनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे कोरोना विषाणू साथीच्या रोगाच्या प्रसारास प्रतिबंधक घालण्यासाठी व त्या संदर्भातील उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यातून सामान्य नागरिकांना मदत व सहकार्य केले जाणार आहे.या नियंत्रण कक्षाशी सामान्य नागरिकांना थेट संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणी सांगता येतील. इतर शासकीय विभागांशी समन्वय साधून त्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस मदत करणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षाचे काम तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार आहे. त्यासाठी ३ पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, १५ कर्मचारी तसेच वाहने व वाहन चालक असे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे.वैद्यकीय सेवेबाबत, अत्यावश्यक वस्तू पुरवठा करण्याच्या सेवेबाबत, संशयित रु ग्णाची माहिती देण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षाचा उपयोग नागरिकांना करता येईल. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ३७ लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यापैकी २५ लोकांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला. अजून १२ जण निरीक्षणाखाली आहेत. एकाचा नमुना शुक्रवारी तपासून झाला, पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.विनाकारण फिरणाऱ्या ३२२ वाहनांवर कारवाईसंचारबंदी लागू असताना बेजबाबदारपणे बाहेर फिरत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया आणि हुल्लडबाजी करणाºया नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या संचारबंदीदरम्यान आतापर्यंत ३२२ वाहनांवर मोटार परिवहन कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांच्याकडून ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जीवनावश्यक साहित्याची अडचण भासू नये यासाठी शासनाने जीवनावश्यक साहित्याची सेवा देणाºया केंद्रांना सूट दिली आहे. परंतू काही बेजबाबदार नागरिक काही कारण नसताना शहरात फिरताना आढळून आले. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

हेल्पपाईन क्रमांक कार्यान्वितया अनुषंगाने शुक्रवारपासून गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्पलाईन क्र मांक सुरु करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना कोरोनासंबंधित कारणाविषयी काही अडचणी असल्यास त्यांनी दिलेल्या क्र मांकावर संपर्क करावे. नियंत्रण कक्षातील अधिकारी सदर हेल्पलाईनवरील तक्र ारीची दखल घेवून तत्काळ प्रतिसाद देतील. त्यासाठी ०७१३२-२२३१४९ आणि ०७१३२-२२३१४२ तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक ९४०५८४८७६७, ९४०५८४८७३६, ९४०५८४९१९७ वर संपर्क करता येईल. सदर सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

वाहतूक शाखेतर्फे मास्कचे मोफत वाटपसंचारबंदीचे गडचिरोली पोलीस दलाकडून काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. फक्त जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची मुभा दिली जात आहे. नागरिकांकडून देखील याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरातील नागरिकांनी फक्त जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी व गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस