ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण; नागपुरातील रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 20:13 IST2021-02-25T20:12:32+5:302021-02-25T20:13:03+5:30
Prakash Amte ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना गुरुवारी संध्याकाळी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण; नागपुरातील रुग्णालयात दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना गुरुवारी संध्याकाळी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकाश आमटे यांची प्रकृती काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांनी केलेली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र प्रकृतीत आराम पडत नसल्याने त्यांनी चंद्रपुरात पुन्हा एकवार कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी नागपुरात येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत आमटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रमुख आहेत.